'मुंबई पब्लिक स्कूल'! मुंबई : मुंबई महापालिकेतही सीबीएसई आणि आयसीएसई या केंद्रीय मंडळाच्या शाळा सुरू होणार आहेत. या शाळांना मुंबई पब्लिक स्कूल असे संबोधण्यात येणार आहे. या शाळांच्या बोधचिन्हाचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण झाले.मंत्रालयात बोधचिन्ह अनावरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी आदी उपस्थित होते.
महापालिका शाळा नव्हे 'मुंबई पब्लिक स्कूल'!