राष्ट्रपतींनी फेटाळली नवी दिल्ली: निर्भया बलात्कार आणि हत्याकांडातील आरोपी अक्षय ठाकूरची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळून लावली आहे. या आधी राष्ट्रपतींनी या प्रकरणातील दोषी मुकेश आणि विनयची दया याचिका फेटाळलेली आहे. त्यामुळे निर्भयाच्या दोषींची फाशी निश्चित मानली जात आहे.अक्षय ठाकूरने १ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दया याचिका सादर केली होती. मात्र राष्ट्रपतींनी त्याची दया याचिका फेटाळून लावली आहे. दरम्यान, आज दिल्ली उच्च न्यायालयाने निर्भया प्रकरणातील सर्व आरोपींना झटका दिला आहे. न्यायालयाने सर्व आरोपींना एकत्रित फाशी देण्याचे आदेश दिले आहेत. या आरोपींना वेगवेगळी फाशी देऊ नये, असं कोर्टाने म्हटलं आहे.
अक्षय ठाकरची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली