महिला राजसत्ता आंदोलनाचे अनुभव सांगायला, रत्नमाला ताईं निघाल्या लंडनला !!!
स्थानिक स्वराज्य संस्था, ताईंचा सत्कार करतांना... भंडारा, गणेशपूर पंचायत
लंडन येथे होत असलेल्या राष्ट्रकुल परिषदेसाठी भारतातून ग्राम पंचायत सदस्या व
महिला राजसत्ता आंदोलनाच्या रत्नमालाताई वैद्य व महिला राजसत्ता आंदोलनाचे प्रणेते
भीमभाऊ रासकर करणार मांडणी.
लोकशाहीसाठी कॉमनवेल्थ देशांची (राष्ट्रकुल देशांची) जागतिक परिषद
दिनांक 04-06 मार्च 2020 रोजी लंडन, युनायटेड किंगडम होत असून या परिषदेसाठी
सर्वसमावेशक आणि लोकशाहीसाठी राष्ट्रकुल देशांची जबाबदारी ह्या विषयावर
ही परिषद असणार आहे.
ह्या परिषदेसाठी भारतातून भंडारा जिल्ह्यातील गणेशपूर ग्राम पंचायत सदस्या व
महिला राजसत्ता आंदोलनाच्या रत्नमालाताई वैद्य व महिला राजसत्ता आंदोलनाचे प्रणेते
भीमभाऊ रासकर ह्यांची राष्ट्रकुल देशांच्या प्रतिनिधींसमोर मांडणी असणार आहे.
ग्राम पंचायती मधील निवडणुकीत महिलांचा सक्रिय सहभाग, महिलांच्या नेतृत्वात
पंचायतीच्या निवडणुका व महिला नेतृत्वाला देण्यात आलेल्या संधीमुळे
ही निवड करण्यात आली आहे.