नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्तानं भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भारतीय हवाईदलामध्ये सामील झालेल्या पहिल्या महिला पायलट टीम भावना कांत, मोहना जितरवाल आणि अवनी चतुर्वेदी यांचा नारी शक्ती पुरस्कार देऊन गौरव केला. अतिशय कठोर मेहनत आणि कष्ट यांच्या जोरावरच आपण इथपर्यंत उड्डाण घेतल्याची भावना या महिला पायलटसनं व्यक्त केली. २०१८ साली भारतीय हवाईदलात महिला फायटर पायलट म्हणून रुजू झालेल्या मोहना जितरवाल, अवनी चतुर्वेदी आणि भावना कांत यांना नारी शक्ती पुरस्कारानं गौरविण्यात आलं. या तिघींनीही २०१८ मध्ये मिग २१ विमानासहीत हवेत झेप घेण्याची कामगिरी केली होती. __ मी भारतीय वायुसेनेचे आभार मानते की आम्हाला फायटर पायलट म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न करत राहा, हाच माझा लोकांसाठी संदेश असेल, असं फ्लाईट लेफ्टनंट मोहना सिंह जितरवाल यांनी म्हटलं.
मिग २१ उड्डाण, मिळाला 'नारी शक्ती सन्मान'