संत शिरोमणी रोहिदास महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती

संत रोहिदास सेवाभावी संस्था मुंबई महाराष्ट्र राज्य
आणि चर्मकार विकास संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेमार्फत संत शिरोमणी रोहिदास महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंतीएक मार्च रोजी साजरी करण्यात येणार असून त्यानिमित्ताने दोन्ही संघटनेच्यावतीने दैनिक महाराष्ट्र सम्राटचे संपादक सन्माननीय श्री चंद्रकांतजी भोईटे साहेब, शिवसेना उपविभाग प्रमुख सन्माननीय श्री शशिकांतजी गुरव साहेब आणि सन्माननीय गणेश भोईटे साहेब यांची सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी ठाणे जिल्हा अध्यक्ष माननीय भास्कर चव्हाण ठाणे जिल्हा सचिव माननीय गणेश चव्हाण ठाणे जिल्हा सल्लागार माननीय विनोद सांगेलकर ठाणे जिल्हा उपाध्यक्ष माननीय अशोक आगवणे उपस्थित होते.



याक्षणी दोन्ही संस्थेच्या भविष्यातील वाटचालीसाठी चंद्रकांत भोईटे साहेबांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.