ठाण्यात रुग्णांच्या सेवेसाठी शिवसेनेच्या अबोली रिक्शा


कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव, त्यामुळे झालेले लॉकडाऊन अशा परिस्तिथीत रुग्ण सेवे विना राहू नयेत म्हणून ठाणे जिल्हा शिवसेनेने आणखी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. शनिवार पासून ठाणे शहरातील रुग्णांच्या मदतीला शिवसेनेच्या अबोली रिक्षाचालक रस्तावर उतरणार आहेत. एकूण 25 अबोली रिक्षा वेगवेगळ्या विभागात ही सेवा देणार आहे.


शिवसेना नेते ठाणे जिल्हा पालकमंत्री ना एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ही सेवा दिली जात आहे. वाहतूक बंद झाल्याने काही रुग्णांना रुग्णालय आणि दवाखान्यात जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळेच पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी अबोलीची सेवा सुरू केली आहे. ठाणे शहर, कोपरी, वागळे इस्टेट, माजीवडा विभाग, कॅडबरी परिसर, टेम्भी नाका परिसर आदी ठिकाणी या अबोली रिक्षा रुग्णांना सेवा देणार आहेत.


रोज सकाळी 10 सायंकाळी 5 या वेळेत ही सेवा सुरू राहणार आहे. ज्यांना खरंच गरज आहे अशा रुग्णांनी  
श्री विनायक सुर्वे 9967312176 व अनामिका भालेराव 8452184558 या क्रमांकावर संपर्क साधावा.


ही सेवा गरजू रुगणासाठी सुरू करत असल्याचे  ना.एकनाथ शिंदे म्हणाले