होळी या आपल्या पारंपारिक सणाच्या शुभ मुहूर्तावर शाश्वत विकासाच्या दिशेने एक पाऊल 






मुंबई : सोमवार दिनांक 9 मार्च 2020 रोजी UDRI च्या काळाघोडा, फोर्ट मुंबई येथील कार्यालयात दुपारी 3 वाजता कुलाबा कोळीवाडा येथील ग्रामस्थ, UDRI चे पदाधिकारी व कोळीवाडा गावठाण सेवा समितीचे पदाधिकारी त्यांची संयुक्त बैठक झाली. काही दिवसापूर्वी खासदार राहुल शेवाळे यांनी मुंबईचे आयुक्त यांच्या दालनात कोळीवाडा गावठाण यासाठी नवीन DCR (विकास नियंत्रण नियमावली) असावी त्याचे 3 पर्याय असावे या 3 पर्याया पैकी कोणताही एक पर्याय आपल्या भौगोलिक दृष्टी व मागणी प्रमाणे तो तो कोळीवाडा गावठाण निवडू शकतो किंवा शकेल. हे सर्व पर्याय  जे नगर रचना विषयातील तज्ञ व कोळीवाडा गावठाण मधील कार्यकर्ते व तज्ञ यांनी संयुक्तपणे अनेक बैठका घेऊन चर्चा विचार विनिमय करून DCR  बनविण्यात आले. ते सादर करण्यासाठी व त्यावर साधकबाधक चर्चा करण्यासाठी पुढाकार घेऊन बैठक घडवून आणली.  त्या बैठकीत मा. मुंबई आयुक्तांनी विषय  तत्वतः समजून घेऊन मान्य केला व त्यातील 3 नंबरचा पर्याय असलेला CLR (COMMUNITY LAND RESERVE) (कम्युनिटी लन्ड  (जमीन) रिझर्व्ह) याचे एक  मॉडल आपण एकतरी कोळीवाड्यात करून दाखवावी. असे  मुंबईच्या आयुक्तांनी नगर रचना विषयातील तज्ञ व कोळीवाडा गावठाण मधील बैठकीला उपस्थित या विषयावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सांगितले. त्या दिशेनेच एक पाऊल म्हणून होळी निमित्त घडत असलेल्या या बैठकीला महत्त्व आहे.  

यासाठी मुंबईतील  जो कोळीवाडा त्यांच्या गावातील  ते वापरत असलेल्या तसेच वहीवाटीच्या  जमिनीची व घरांची  मालकी व वापरा बाबतची सत्य माहिती संकलित करून देईल तसेच त्या गावातील राहत असलेल्या सर्वांची १०० टक्के सहमती घेऊन येईल त्यानंतरच  त्या गावाचे आपण बनविलेले सर्व समावेशक असे शाश्वत विकासाचे मॉडल आपण शासनाला दाखवू शकतो या संदर्भात कुलाबा कोळीवाड्यातील गावाच्या शाश्वत विकासासाठी काम करणारे  बांधव  कोळीवाड्यातील सर्व भूमिपुत्रांच्या त्यांना सतवणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तर  जाणून घेण्यासाठी बैठकीला हजर होते.त्यांच्या सर्व शंकांचे निरसन होऊन कुलाबा कोळीवाडा आपल्या गावातील सर्व घरांची योग्य व खरी माहिती संकलित करून प्रथम कोळीवाडा गावठाण सेवा समिती ला देईल आणि त्यानंतरच UDRI ची नगर रचना विषयातील तज्ञ मंडळी पुढील कामाला सुरुवात करतील अशी सर्व सकारात्मक चर्चा होऊन बैठक संपली. असे कोळीवाडा गावठाण सेवा समिती आणि

ठाणे शहर गावठाण कोळीवाडे पाडे संवर्धन समितीने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे.