भारतासह जगभरात करोना व्हायरसने खळबळ आणि दहशत माजवली आहे.
आत्तापर्यंत भारतात करोनाची लागण झाल्याने दोघांचा बळी गेला आहे. याचसंदर्भात आता केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे.
करोनामुळे ज्या व्यक्तींचा मृत्यू होईल त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना चार लाखांची मदत देण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे.