होळी करा लहान, पोळी करा दान


महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे शाखा तर्फे ९ मार्च २०२० रोजी होळी करा लहान, पोळी करा दान हा उपक्रमा राबविण्यात आला.

 

आपला परिसर, समाज व देश यांचे हित डोळ्यासमोर ठेवून आपल्या सण, परंपरांमध्ये योग्य बदल घडविणे हे आपल्या समाजाचे एक अभिमानास्पद वैशिष्ठ्य आहे. त्यास अनुसरून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कल्याण शाखेने ‘होळी करा लहान, पोळी करा दान’, हा उपक्रम या वर्षीही दिनांक ९ मार्च २०२० रोजी राबविण्यात आला. या उपक्रमात, होळी लहान करून पर्यावरण वाचवावे व पुरण पोळी; होळीत अर्पण न करता दान करून गरीबांच्या मुखात घालावी हे आवाहन करण्यात आले होते. या दान केलेल्या पोळ्या गरिबांमध्ये वाटण्याची व्यवस्था महाराष्ट्र अंनिस ठाणे शाखेने केली होती. तसेच होळी निमित्ताने आपण सर्वांनी पाण्याच्या जास्त नाश होणार नाही व नैसर्गिक कलरच्या वापर करून आपण होळी रंगपंचमी साजरी करावी असे आव्हान सोसायटी मध्ये करण्यात आले.

वरील आवाहनास ठाणे व कळवा परिसरातील विविध गृहनिर्माण सोसायट्या, सार्वजनिक होळी मंडळे यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ह्या कार्यक्रमाला पुढील सोसायट्या, मंडळे यांनी प्रतिसाद दिला. महात्मा फुले नगर मधील चिंतामणी सोसायटी, साई एकविरा गोविंदा पथक, अष्टविनायक मित्र मंडळ,विराट सोसायटी पारसिक नगर, Grand square society, rosa bella society, A ओम साई मित्र मंडळ, वसंत विहार व्होल्टास सोसायटी इ.सोसायटी मध्ये हा उपक्रम आपण राबिवला.


सुमारे २५० पोळ्या गोळा करण्यात आल्या. या सर्व पोळ्यांचे वाटप कळवा नाका येथील परिसरातील गरीब वस्तीत, रस्त्यावर कचरावेचणारे ठाणे रेल्वे स्टेशन पूर्व व ठाणे रेल्वे स्टेशन पश्चिम, तलावपाली, खारेगाव बस डेपो परिसरात करण्यात आले. या पुरणपोळ्यांचा लाभ असंख्य लोकांनी घेतलाच पण गाडी चुकल्याने मुकामास राहिलेले प्रवासी, ठाणे स्टेशनचे सफाई कामगार सर्वांनी कळवा व ठाणे परिसरातील व महाराष्ट्र अंनिस कार्यकर्त्यांचे मनापासून आभार.


पुरणपोळ्यांचे गोळा व वाटप करण्यामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे शाखेचे कार्यकर्ते भोसले अजय महादेव आनंदी, करण पाटील, अक्षीता पाटील, पुष्पा तापोळे, वंदनाताई शिंदे (माई) यांनी भरपूर मेहनत घेतली.


या उपक्रमाचे ठाणे शहरातील नागरिकांनी अत्यंत उत्साहाने स्वागत केले व समाजात पर्यावरणाविषयी तसेच सामाजिक बांधिलकी विषयी जागृती करणारे असे उपक्रम महाराष्ट्र अंनिस ने जरूर राबवावेत असे मत अनेक ठाणेकरानी कार्यकर्त्यांशी संपर्क केले.