राजमुद्राच्या कार्यकर्त्यांनी घेतली महिला वरिष्ठ पोलीस निरिक्षकांची भेट
मुंबई (प्रतिनिधी) : नागपाडा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्रीमती शालिनी शर्मा यांच्यावर जाणूनबूजुन हल्ला करणाऱ्या जमावाची चौकशी करुन गुन्हे दाखल करा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राजमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री संदिप साबळे यांनी दिला आहे.आज नागपाडा पोलीस स्टेशन येथे महिला पोलीस कर्मचारी यांच्यावर झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी श्री साबळे यांनी श्रीमती शालिनी शर्मा यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.
नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध म्हणून नागपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीसांची कोणतीही परवानगी न घेता जमाव एकत्र होऊन आंदोलन छेडले गेले होते.सीएए विरोध करण्यासाठी मोठा जनसमुदाय एकत्र जमला होता.याच पार्श्वभुमीवर येथील जमावाने पोलीसांची कोणतीही पुर्वपरवानगी न घेता रस्त्यावर स्टेज उभा केला होता.
त्यामुळे सदरचा स्टेज पुर्वपरवानगी न घेता किंवा अनधिकृत तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्याने कारवाई करण्यासाठी श्रीमती शालिनी शर्मा गेल्या.मात्र याच दरम्यान सीएएच्या आंदोलन कर्त्यांना विचारणा करण्यास गेलेल्या नागपाडा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोसील निरिक्षक सौ शर्मा यांना या जमावाने धक्काबुकी करण्याचा प्रयत्न केला होता.याबाबत व्हिडीओ सोशल मिडीयावर फिरल्यानंतर विविध स्तरावरुन महिला पोलीसांना धक्काबुक्की केल्याने निषेध व्यक्त करण्यात आला होता.
या धक्काबुकी आणि महीला पोलीस कर्मचाऱ्याला झालेल्या या अपमानास्पद वागणुकीबाबत राजमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री संदिप साबळे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.ते पुढे म्हणाले की सौ.शर्मा यांच्यासोबत झालेली वागणुक खूपच अपमानास्पद आहे.कायदा व सुव्यवस्था संतुलित रहावी म्हणुन पोलीस अधिकारी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून सुरक्षा देत असतात.त्यामुळेच आपण सुरक्षित आहोत.मात्र आंदोलनाच्या नावाखाली महिला पोलीसांना कोण लक्ष करीत असेल तर राजमुद्रा प्रतिष्ठान गप्प बसणार नाही.ज्या सीएएच्या विरोधात आंदोलन करीत असतील तर त्याच पद्धतीत आम्ही हजारोंच्या संख्येने समर्थन करण्यासाठी रस्त्यावर उतरु असा इशारा दिला आहे.
दरम्यान सीेेएए विरोधात आंदोलनात स्टेज उभारण्यासाठी आंदोनकांनी पोलीसांना विरोध करण्यासाठी राष्ट्रगीताचाही अवमान केला आहे.त्यामुळे अशा देशद्रोही जमावावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी श्री साबळे यांनी केली आहे.आज सौ.शर्मा यांच्या समर्थनार्थ नागपाडा पोलीस स्टेशन येथे जावून राजमुद्राच्या अनेक कार्यकर्त्यांनी भेट घेतली आहे.
दोषींवर कारवाई निश्चित
मी किंवा जमाव असेल जे धक्काबुक्की करण्यास दोषी असतील त्यांच्यावर वरिष्ठ पातळीवरुन कारवाई निश्चित होणार आहे.आम्ही आंदोलनात जो काही प्रकार घडला त्याची सत्य चित्रफित वरिष्ठांना दिली आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की, धक्काबुक्की करणाऱ्या व्यक्तिंचा तपास होऊन गुन्हे दाखल होतील.
- श्रीमती शालिनी शर्मा
वरिष्ठ पोलीस निरिक्षक,नागपाडा पोलीस स्टेशन