कोरोना संदर्भात रस्त्यावर केलेल्या बंदोबस्ताचे अनुभव.. - एक पोलीस अधिकारी


आम्ही दिवसभर पूर्ण शहरात


 'बाहेर निघू नका..सहकार्य करा...परिस्थिती गंभीर आहे'


..या सूचना देत फिरलो.. 


पोलीस गाडी येण्याआधी खूप मोठा घोळका गल्लीत,चौकात जमलेला असायचा (संपूर्ण कामधंदा बंद असल्याने असेल कदाचित)


ती गर्दी आणि इटलीची सध्याची स्थिती याचा विचार केल्यावर मात्र अंगावर काटा उभा राहत असे..


गाडी आल्यावरही गर्दी पांगत नव्हती..गाडीकडे सर्कस यावी तसे पाहत होते..


समजावून सांगितले तर 'जातो ना' 'अहो इथेच घर आहे जातो लगेच' ..ही ठरलेली उत्तरे..


काही वेळा तर काही तरुणाई इतकी उत्साहात होती की पोलीस गाडी आल्यावर ते पळून जाऊन हुल्लडबाजी करायचे..


समजत नव्हते...यांना या आजाराचे गांभीर्य कसे समजावून सांगावे..


त्यात दुचाकी व चारचाकी वाले.. 'आम्ही दवाखान्यात चाललो' हेच उत्तर देऊन आम्हाला संकटात टाकायचे..


नुसता वैताग आला होता..त्यात पूर्ण परिसरात फिरणे...लोकांशी बोलणे..यात आम्हाला प्रादुर्भाव होण्याची भीती ती वेगळीच!


मग विचार केला..


गाडी घेऊन निघालो...चौकात थांबवली..एक दोन जणांना काठीने पायावर फटकारले...एका क्षणात गर्दी गायब!


नंतर मात्र चौकात जमायची कुणी फारशी हिम्मत केली नाही..
दुचाकी चारचाकी यांना पण मार देऊ या अविर्भावात सामोरे गेलो..


परिसरात बातमी फिरली...


पोलीस पाहतच क्षणी झोडपताय...परिसर निर्मनुष्य झाला..


आम्हाला जे हवे होते ते झाले...


मग आमचा मार्ग अयोग्य की योग्य याचा विचार नव्हता...कारण संकट हे फक्त लोकशाही,एखादी सत्ता किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य उलथवून टाकणारे नव्हते तर अवघी मानव जात धोक्यात आणणारे आहे..


बंदोबस्त आटोपून मग विचार आला..


बसली असेल एखाद्या निष्पाप व्यक्तीला लाठी...पण शेकडो ची गर्दी पांगली...लाखोंने होणारे संसर्ग वाचले..


खाल्ला असेल एखादया चांगल्या पदावरच्या व नियमात वागणाऱ्या,चूक नसणाऱ्या व्यक्तीने मार....पण तडफडत होणार मृत्यू तर वाचला..


पोलिसांची दंडुकशाही वाढली तर पुढे हीच तुमची सवय बनेल आणि...मग अभिव्यक्ती स्वातंत्र्य गमावून बसाल...
अस मत व्यक्त करणार्यांना एकच सांगणे..
ह्या सगळ्यांसाठी जिवंत असणे गरजेचे आहे...


पद, प्रतिष्ठा, अधिकार, स्वातंत्र्य, लोकशाही हे सर्व बाजूला ठेवावे असे संकट  नक्कीच आहे...हे इटलीचे दृश्य पाहिल्यावर तरी वाटते..


आणि हो...
विनाकारण फिरणार्यांवर गुन्हा दाखल करा..असा एक मतप्रवाह आहे..
गुन्हा दाखल करणे ही वेळखाऊ प्रकिया आहे...घोळक्याने फिरणाऱ्या लोकांना पकडून त्यावर गुन्हा दाखल केला तर फक्त 20 ते 40 लोकांवर गुन्हे दाखल करण्यावर पूर्ण पोलीस स्टेशन कामाला लागेल..आणि फिरणारे हजारोंनी असतात..


नेहमी प्रमाणे पोलिसांना दूषणे देण्याची ही वेळ नक्कीच नाही...
ती संधी नन्तर कधी तरी तुम्हाला नक्कीच मिळेल.. आणि आम्ही पण त्यावेळेस सर्व सहन करू..


कारण आपण तेव्हा सगळे जिवंत राहू !