आपल्या देशात तसेच इतर प्रगत देशातील मानवावर आलेल्या या कोरोना विषाणू (व्हायरस) रुपी संकटापासून सर्व मानव जातीचे रक्षण करण्यासाठी दिवस रात्र व अथक परिश्रम घेत असलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय, इतर सर्व कर्मचारी, संशोधन करणारे शास्त्रज्ञ, अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी, देशातील सर्व नागरिकांना सुरक्षा पुरवणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी, देशातील सर्व नागरिकांना जीवन आवश्यक वस्तू पुरविणाऱ्या सर्व यंत्रणा व त्या यंत्रणांमध्ये काम करणारे सर्व कर्मचारी वरील सर्व विभागातील सर्वजण आपला स्वतः चा जीव धोक्यात घालून आम्हा देशातील सर्व नागरिकांच्या साठी करीत असलेल्या कामाला देत असलेल्या आपल्या योगदाना ला वैयक्तिक माझा तसेच आम्हा सर्व भारतीय नागरिकांचा मानाचा मुजरा.
आपल्या सर्वांच्या कामाचा, कार्याचा मान सन्मान राखूनच व आपल्या कार्याला समर्पित होऊनच खालील लेख लिहित आहे.
कोरोना शाप ? की वरदान ?
हा लेख लिहिण्यास कारण की १९७० ते १९९०/९५ या वर्षा दरम्यान ज्याचा जन्म झाला त्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या शाळेतील ८ वी, ९ वी, १० वी इयत्तेत परीक्षेला तीन ते चार विषय दिले जायचे त्यातील एका विषयावर निबंध लिहिण्यास सांगितले जायचे जो तो विद्यार्थी जो विषय सोपा वाटेल त्यावर निबंध लिहायचा आणि परीक्षेत आपले मार्क मिळवायचा. त्यात 'विज्ञान शाप की वरदान' हा विषय नक्कीच असायचं.आज संपूर्ण पृथ्वीवर विविध देशात वास्तव्य करणाऱ्या मानवाला स्वतः चे आत्मचिंतन आत्मपरीक्षण करायला लावणारा एक निबंध नक्कीच लिहायचा आहे व विषय आहे कोरोना मानवासाठी शाप ? की वरदान ?
या विश्वातील भूतलावरील प्रत्येक मानव तो कोणत्या धर्माचा, जातीचा, वर्णाचा आहे? कोणत्या लिंगाचा स्त्री, पुरुष, तृतीय पंथी आहे तो समलिंगी का विषम लिंगी संबंध ठेवणाऱ्या आहे? देव मानणारा, देवावर श्रद्धा ठेवणारा, विज्ञान वादी, तत्वज्ञान वादी, अंधश्रद्धा निर्मूलन वाले,विकासाच्या बाजूने आहे ?, विकासाच्या विरूद्ध आहे ?, देश प्रेमी आहात का ? देश द्रोही ? कोणत्या पक्षाला मानणारा असो ? कोणत्या नेत्याला मानणारा असो ?, कम्युनिस्ट, समाजवादी, कोणतीही राजकीय सामाजिक भूमिका आवडणारा असो, पर्यावरण प्रेमी वादी, गुन्हेगार आहे का सामाजिक कार्यकर्ता किती शिक्षित आहे का अशिक्षित, तो कोणत्याही क्षेत्रात काम करणारा असो का ? व्यवसाय करणारा,उद्योगधंदा करणारा कारखानदार भांडवलदार असो का तेथील कामगार,अर्थ तज्ञ, शास्त्रज्ञ, डॉक्टर, वकील, पोलीस, सरकारी नोकर,पोलीस अधिकारी, आयएएस, आयपीएस, जिल्हाधिकारी, राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, राज्यातील मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक, सरपंच, ग्रामसेवक, आपल्या उदरनिर्वाहाकरिता हातावर पोट भरणारा काम करणारा सामान्य नागरिक का ? ज्याच्याजवळ काहीच नाही असा निर धन असा काहीही कामधंदा न करणारे गरीब ? कोणत्याही वयोगटातील मानव, का कोणत्याही देशाचे नागरिक अजून भरपूर उदाहरण देता येतील यापैकी कोण किंवा या वैतिरिक्त ही कोणीही या सर्वांनाच एका नजरेने पाहणारा एका प्रकारचीच वागणूक देणारा कोणताही भेदाभेद न मानणारा, भेदभाव न करणारा व आपले काम योग्यरीतीने, योग्य पद्धतीने करणारा व शेवटी योग्य निकाल देणारा कोरोना, कोरोना, कोरोना
या पृथ्वीतलावर जगणारा एक अति सामान्य सजीव मनुष्यप्राणी हीच बिरुदावली लावणार मी आता यापुढे हीच माझी ओळख मला हा लेख वाचणाऱ्या सर्वांनाच हात जोडून हीच विनंती करायची आहे की आपण सर्वच जण ज्या संकट काळातून जात आहोत या काळात आपल्या पैकी कोणाही कडून कोणताही गैरसमज पसरविला गेला नाही पाहिजे आणि हा थट्टा मस्करीचा विषय नक्कीच राहिला नाही आपण कोणाला मदत सहकार्य करू शकलो नाही तरी चालेल पण कोणाचेही मनोधैर्य खच्चीकरण होईल असे वर्तन नक्कीच करणार नाही कारण या भूतलावर मनुष्य हाच एक असा सजीव आहे की त्याला बुध्दी आहे तो विचार करू शकतो विचार व्यक्त करू शकतो इतरांना मदत सहकार्य करू शकतो व्यापक स्वरूपात जनजागृती करू शकतो या भूतलावरील इतर कोणत्याही सजीव प्राण्याला असे करावे वागावे असे कितीही वाटले तरी तो प्रेम व्यक्त करणे, प्रजनन करून आपल्या सारखाच नवीन जीव निर्माण करणे व वैयक्तिक फक्त स्वतः चे पोट भरण्यापलीकडे कोणतीही गोष्ट करू शकत नाही.
त्यामुळे आतातरी आई, बाबा, भाऊ, मुलगा, मुलगी, मित्र, मैत्रीण ही सर्वच नातीगोती बाजूला ठेऊन एक माणूस म्हणून व्यक्त होऊया कोणत्याही माध्यमाचा वापर करून उदारणार्थ लिहून, गाऊन,बोलून त्याच्याकडे जे साधन माध्यम असेल त्याचा वापर करून त्या मार्गाने नक्कीच व्यक्त व्हावे पण व्यक्त होताना त्या प्रत्येकाने स्वतः शी च हे वचन घ्यावे की मी माणूस म्हणून व माझे कर्तव्य म्हणून कोणत्याही प्रकारचा अपप्रचार व गैरसमज पसरवणार नाही, कोणाचाही अपमान, द्वेष न करता, पूर्वग्रह न ठेवता, आपण तेवढे शहाणे,हुशार, सर्व ज्ञानी, समाजसेवक बाकी सर्व मूर्ख हा भाव न ठेवता, शासनाला, प्रशासनाला, पोलीस यंत्रणेला माझे प्रथम कर्तव्य म्हणून संपूर्ण सहकार्य करेल. तसेच स्वतः ला व देशा तील प्रत्येक माणसाला संरक्षित ठेवण्यासाठी मिळालेल्या वेळेचा दिवसांचा आत्मचिंतन व आत्मपरीक्षण करून सदुपयोग करेल. असा पद्धतीने सर्वांनी नक्कीच व्यक्त व्हावे.
एक मनुष्य (माणूस) म्हणून या दिवसात मला जो अनुभव आला आणि जे आत्मचिंतन व आत्मपरीक्षण केल्यावर जे मला वाटत आहे ते मी व्यक्त होत आहे.
एका ना एका दिवशी आपण सगळेच मरणार आहोत हे अटळ सत्य आहे व हे आपल्या सर्वांनाच नक्की ठाऊक देखील आहे.
पण मरायचे कोणालाच नाही.
मानवाच्या उत्पतीला हजारो वर्षे झाली हजारो वर्षानंतर आपण हेच म्हणतो की दिवसागणिक मानवाने प्रगती केली कारण की या पृथ्वीतलावर सर्वात हुशार,शूरवीर आणि काहीही, केव्हाही, कधीही कोणतीही गोष्ट करू शकणारा ज्याला काहीही अशक्य नाही असा सर्व शक्तिमान जर कोण असेल तर तो मनुष्य प्राणी या मानवाने असंख्य शोध लावले. पृथ्वी सोडून तो शोध लावण्यासाठी चंद्रावर,मंगळवार पण पोहचला.हे सर्व शोध लावले किंवा नवनवीन प्रयोग करून तंत्रज्ञान वापरून त्याने ज्या ज्या वस्तू निर्माण केल्या त्याचा इतर मानवांना उपयोग व्हावा फायदा व्हावा यासाठी निर्माण केल्या गेल्या आपल्या तंत्र ज्ञानाच्या जोरावर त्याने सर्व जग विश्व जवळ आणले आहे आज जे मी लिहून आपल्या पर्यंत पोहचविणार आहे हा ही याच तंत्रज्ञानाचा फायदा. मानव जे जे म्हणून शोध लावत होता किंवा आहे ते या सजीव माणसाला केंद्र स्थानी धरुनच नंतर इतर सजीवांच्या साठी अथवा इतर कृत्रिम गोष्टीसाठी हे सर्व घडत असताना पर्यावरणाचा अभ्यास करणारे तज्ञ पर्यावरणवादी अनेक वर्षांपासून ग्लोबल वॉर्मिग चे दुष्परिणाम सुरू झाले आहेत पर्यावरणाचा समतोल बिघडतो आहे. सर्व जगाने सर्व मानव जातीने त्याकडे गांभीर्याने घ्यावे असे ओरडून ओरडून सांगत होते व आहेत.
पण पर्यावरणाचा निसर्गाचा विनाश करत माणूस हा एक असा स्वार्थी प्राणी आहे त्याने फक्त स्वतः च्या फायद्याचा व आपले राहणीमान उचवले जाईल असा विकास करण्यातच धन्यता मानली. माणसाने स्वतः चा विकास करता करता पर्यावरणाचा विनाश च केला.झाड लावली असतील कमी पण तोडली असतील जास्त, डोंगर फोडून सपाट केले असतील हजारो पण कधी ऐकल का मानवाने एक डोंगर बनविला डोंगर बनवला आहे तो ही त्याने केलेल्या कचऱ्याचा, समुद्र, खाडी वेगवेगळ्या प्रकल्पासाठी बुजविण्यासाठी जी तत्परता दाखवली ती पाणथळ जागा तलाव, खाडी, समुद्र यांचे किनारे व पात्र विस्तृत करताना त्यासाठी प्राधान्य घेताना पुढाकार घेताना दिसला नाही.
आज मानवाने (त्यात मी देखील आलो) आपल्या कोणत्या ना कोणत्या कृतीतून कधी ना कधीतरी किंवा नेहमीच या पर्यावरणाचे कमी अधिक प्रमाणात नुकसानच केले आहे व करतो आहे या सजीव किंवा निर्जीव नैसर्गिक साधन संपत्ती चा उपयोग करून आपला वैयक्तिक स्वार्थ साधला आहे फायदाच केला आहे आणि पर्यावरणाला, निसर्गाला ओरबडले आहे आणि हे सर्व करताना आपण काही चुकीचे करतो आहे ही भावना सुद्धा माणसात नाही आणि पर्यावरणाने, निसर्गाने या अदभुत शक्तीने आपल्या सढळ असा हजारो हाताने माणसाला दिलेच आहे आणि आज देखील देतच आहे.पण हाच मानव या पर्यावरणापुढे,निसर्गापुढे, या अदभुत अलौकिक शक्ती पुढे किती खुजा (छोटा) आहे याचा प्रत्येय आज प्रत्येक मानव घेतच असेल व आहे.
संपूर्ण जगात तसेच आपल्या देशात या क्षणाला अनेक मानव निर्मित समस्या आहेत वेगवेगळे विषय घेऊन मतभिन्नता असणारे वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करीत आहेत. मी हिंदू, मी मुस्लिम, मी शीख, मी इसाई, मी या जातीचा, मी त्या जातीचा, माझीच जात सर्वश्रेष्ठ, माझा धर्मच सर्वश्रेष्ठ माझ्या धर्माचे जगावर राज्य असावे व माझ्या देश सर्व शक्तिमान व जगावर अधिराज्य गाजवणारा होऊ दे, काहींना या पक्षाचे सरकार पाहिजे काहींना दुसऱ्या पक्षाचे काहींना हाच नेता देशाचा हवा काहींना तो नको, काहींना CAA,NRC,NRP पाहिजे, काहींना ते नको, काहींना हिंदू राष्ट्र पाहिजे, काहींना सेक्युलर राष्ट्र, काहींना संविधानाची काळजी, काहींना संविधान बदलायचे आहे, शेतकरी आत्महत्या, शेतकरी हमीभाव, देशात येणारा सुका दुष्काळ, कधी ओला दुष्काळ, भूमिपुत्रांच्या सिमांकनाचा प्रश्न, मासेमारीचा प्रश्न, जमिनीच्या मोबदल्याचा प्रश्न, भूसंपादनाचा प्रश्न, काहींना यांचं सरकार जाऊन आमचं सरकार याव अस वाटत त्यासाठी रोज प्रयत्न केला जातो काहींना खासदार, आमदार,नगरसेवक, नगराध्यक्ष, सरपंच होऊन देश सेवा समाजसेवा करायची आहे असा प्रत्येक माणूस आप आपले समुदाय घेऊन वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करतो आहे अशा विविध विषयावरील चळवळी लढाया चालू आहेत का ? तर स्वतः ला जिंकविण्यासाठी व आपणच सर्वश्रेष्ठ असल्याचे सिद्ध करण्यासाठी हे एकी कडे चालू आहे तर संपूर्ण जग आप आपल्या परीने विकास कामे करत आहेत विकासाच्या योजना प्रकल्प राबवित आहेत. जगात ,देशात दळणवळण जास्तीत जास्त सुलभ व्हावं म्हणून मोठे मोठे रस्ते, ब्रीज, पुल, फ्री वे,कोस्टल रोड,सी लिंक, मेट्रो, मोनो, बुलेट ट्रेन, जल वाहतूक, रो रो सेवा असे असंख्य दळणवळणाचे प्रकल्प आले आहेत काही येण्याच्या प्रतिक्षेत आहेत ते आपल्याला ठाऊक असतील ज्या माणसाला मनुष्याला केंद्रस्थानी धरून किंवा त्याच्या सुखसोयी साठी आज पर्यंत ते निर्माण केले गेले आहेत व यापुढेही निर्माण होणार आहेत त्या सर्व रस्तांना मानवाने त्याचा उपयोग करू नये त्यावर दिसू नये यासाठी संचार बंदी घालण्यात आली आहे तसेच अनेक विकासाच्या गोष्टी ज्या मानवा साठी निर्माण केल्या गेल्या होत्या व यापुढे निर्माण केल्या जाणार आहेत त्याला निर मनुष्य करण्याची वेळ त्यावर त्याने फिरू देखील नये त्याचा वापर करू नये असे आदेश देण्याची वेळ देखील मनुष्यावर का आली याचा बोध आपण सर्वांनीच घ्यायला हवा. आता जितके दिवस घरात आपण असणार आहोत तेव्हा याचे आपण सर्वांनीच आत्मपरीक्षण नक्कीच करावे.
देव, ईश्वर, अल्ला, येशू, आहे का ? नाही ? हा मोठा वादाचा विषय आहे मला स्वतः ला या वादात पडायचं नाही त्यावर चर्चा करायची देखील नाही तेवढ्या पात्रतेचा मी नक्कीच नाही.
'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' हा संत तुकारामा चा अभंग तसेच इतर सर्व संतांनी लिहिलेले कित्येक दशकापूर्वी लिहून ठेवलेले अभंग वाचले किंवा त्यातील ओळी आठवल्या की त्यांची प्रत्येक चराचरा मध्ये ईश्वर आहे सजीव वस्तू असो की निर्जीव वस्तू सर्व ठिकाणी जिवंतपणा आहे हे संत सांगतात. त्यांनी त्यावेळी लिहून ठेवलेले अभंग त्यातील प्रत्येक शब्द नी शब्द किती दूरदृष्टी ठेवून व विचार करून लिहिला असेल कारण आज आपण आपले हे मानवाचे धकाधकीचे जीवन जगताना देखील त्यांनी लिहिलेल्या अभंगातील ओळी आता आपण चुकीच्या पद्धतीने मनुष्य जीवन जगताना असे करू नका जगू नका असे आपल्याला मार्गदर्शन केले तरी देखील आपण त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो आणि त्याच त्याच चुका सातत्याने करतो आहे. त्यांनी लिहून ठेवलेले विचार,अभंग तेव्हाही जिवंत होते आजही जिवंत आहेत. निर्वाणी च्या अभंगातील ही ओळ पण बरच काही सांगून जाते.
माझं काही नाही देवा, तुझचं हे सारं
तुझा परिवार देवा, तुझाची संसार
सर्वच धर्माच्या धार्मिक ग्रंधात कित्येक वर्षापूर्वीच काही गोष्टी लिहून ठेवल्या होत्या व त्या तंतोतंत खऱ्या आहेत त्याची प्रचिती आज येते आहे.शालेय जीवनात अनेक सुविचार आपण शाळेतील फळ्यावर नेहमीच वाचत आलो लिहित देखील आलो त्यातील एक सुविचार 'गर्वाचे घर खाली'.
माणसाला आपण माणूस असल्याचा हुशार व सर्व शक्तिमान असल्याचा गर्व होता तो आता खाली आला आहे हे सर्व सुविचार लिहिणाऱ्या संत महात्म्यांना त्यांच्या आकलन शक्तीला व दूरदृष्टीचा सलाम आज महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारत देशातील सर्व जनजीवन ठप्प आहे आज या निसर्गाने, पर्यावरणाने, अदभुत अलौकिक शक्ती ने सर्व जगाला या पृथ्वी वरील सर्व देशांना दाखवून दिले की तुम्ही फक्त एक साधारण मानव आहात.
भारतातील संपूर्ण पृथ्वीवरील अनेक प्रगत देशातील मानवाचे जनजीवन ठप्प व थांबवणाऱ्या या शक्तीला एक नाव पण आहे कोरोना विषाणू एक व्हायरस, एक रोग,एक आजार आणि पृथ्वीवरील संपूर्ण मानव जात एकत्र मिळून एकच लढाई लढत आहे ती ही जगण्याची व स्वतः ला जागविण्याची आणि आप आपला जीव वाचविण्यासाठी स्वतः ला दुसऱ्या मानवा पासून वेगळा करतोय वेगळा ठेवतोय आणि म्हणतोय गो कोरोना गो.
असा हा जगातील प्रत्येक मानवाला जगण्याची शिस्त,जीवनाचे निसर्गाचे,पर्यावरणाचे, अदभुत अलौकिक शक्ती चे महत्त्व शिकविणारा सर्वांना एकाच गोष्टीचे अनुकरण करायला लावणारा माणसाला माणूस म्हणून स्वतः चे आत्मपरीक्षण, आत्मचिंतन करायला लावणारा कोरोना चांगला का ? वाईट ?
गिरीश वि. साळगांवकर
9820887755