ट्रॅफिक तणाव-मुक्त ठाणे भाजपाचे लोक अभियान

   


कळवा नाका येथे ठाणे शहरातील वाढती वाहतूककोंडी लक्षात घेऊन, भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, खासदार डॉ. विनयजी सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ट्रॅफिक तणाव-मुक्त ठाणे लोक अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अभियानानुसार ठाण्यातील महत्वाच्या 20 ठिकाणी झालेल्या स्वाक्षरी अभियानात हजारो ठाणेकरांनी सहभाग घेऊन वाढत्या ट्रॅफिकविषयीची नाराजी व्यक्त केली. सदरच्या अभियानात श्री.निरंजन डावखरे साहेब (आमदार तथा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष) श्री.मनोहर सुखडरे (सरचिटणीस ठाणे शहर) श्री.हिरोज कपोते (कळवा मंडळ अध्यक्ष) श्री.गणेश भालेकर (सरचिटणीस ठाणे शहर जिल्हा अनु.जाती मोर्चा) श्री.कुणाल पाटील(मुंब्रा मंडळ अध्यक्ष)श्री.निलेश पाटील(ठाणे शहर अध्यक्ष युवा मोर्चा) श्री.संजय पाटील (ठाणे शहर उपाध्यक्ष) हर्षला बुबेरा(अध्यक्षा ठाणे शहर महिला मोर्चा) श्री.चेतन कोळी(अध्यक्ष मच्छीमार संगठना)श्री.ठोसर काका,कन्हयालाल विश्वकर्मा,पुरुषोत्तम पाटील,तेजस चांद्रमोरे,प्रशांत पवार,अमीन मिश्रा,लुक्समिकांत यादव तसेच कळवा मुंब्रातील सर्व युवा कार्यकर्ते पदाधिकारी व महिला आघाडी उपस्थित होते.



ठाणे शहरात येणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर दररोज वाहतूककोंडी होत आहे. ठाणेकरांना दिलासा देण्यासाठी मेट्रो व कोपरी पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत शहरातून जाणारी अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करावी, तसेच भाईंदर-भिवंडी ते उरण आणि उरण ते भिवंडी-भाईंदर वाहतुकीसाठी ठाणे शहराला वगळून पर्यायी माध्यमे आणि मार्ग विकसित करावेत आणि वाहतुकीचा जाच सहन करणाऱ्या ठाणेकरांना मुंबईत जाता-येता भरावा लागणारा टोल पूर्णपणे माफ करावा.



आदी मागण्या आम्ही भाजपाच्या वतीने केल्या आहेत. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. मिस्ड कॉल देऊनही अभियानात सहभाग व्हा ०८०४५९३६०७७ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊनही ठाणेकरांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावे.