टोरंट कंपनीचा वीज ग्राहकांना पहिलाच जोरदार झटका
कळवा (बातमीदार) : मनीषा नगर, कळवा येथे गेट क्रमांक 1 जवळ श्रुष्टी अपार्टमेंट मागील बाजूस महावितरणच्या 'ट्रान्सफार्मर'ची केबीन आहे. मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक या केबीनला आग लागल्याने मोठा स्फोट झाला व धुराचे लोट निर्माण झाले.आग लागल्याने अग्निशमन दलाच्या गाड्या वेळीच पोहोचल्याने आग नियंत्रणात आली मात्र परिसरातील वीज दोन तास गायब झाल्याने लोकांना त्रास सहन करावा लागला.
कळवा, मुंब्रा, शीळ डायघर परिसरात महावितरणचे खाजगीकरण होऊन 1 मार्च पासून हा ठेका 'टोरंट'कंपनीला दिला आहे. मात्र दोन दिवसांतच ट्रान्सफार्मर जळून वीज दोन तास गायब झाल्याने येथील नागरिकांना 'टोरंट'चा जोरदार विजेचा झटका बसल्याने लोकांनी टोरंट च्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली आहे.
कळव्यात आगीने 'ट्रांन्सफार्मर' जळून खाक