ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समितीमधील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या आणि नागरिक सोशल डिस्टन्सचे उल्लंघन करत असल्याने आज वागळे प्रभाग समिती कार्यक्षेत्र 3 मे पर्यंत पूर्णतः बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी या प्रभाग क्षेत्रात कोरोनाचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्याबाबत दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर व महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या सुचनेनुसार कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आज रात्री 12 वाजलेपासून वागळे प्रभाग कार्यक्षेत्रात 3 मे पर्यंत पूर्णतः बंद करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला आहे.
ठाणे महानगरपालिका हद्दीतील वागळे प्रभाग समिती क्षेत्रात कोविड-19 रुग्णांची वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि 28 मार्च 2020 पासून वागळे प्रभाग समितीचे संपूर्ण कार्यक्षेत्र 3 मे पर्यंत संपूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे.
वागळे प्रभाग समिती परिसरातील कोरोना रुग्णांची दिवसेदिवस वाढत चाललेली संख्या विचारात घेवून या परिसरातील नागरिक तसेच स्थानिक नगरसेवक यांच्याद्वारे सुरक्षेचा उपाय म्हणून सदरचा परिसर पुर्णपणे बंद करण्याबाबतची मागणी होत आहे. यासंदर्भात जिह्याचे पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे व महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी देखील वागळे प्रभाग समिती कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कठोर उपाययोजना करणेबाबत सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सदर परिसरात कोरोना पॉझिटिव्ह विषाणूचा वाढत चाललेला संसर्ग कमी करण्यासाठी संपूर्ण परिसर नागरिकांच्या वावरासाठी संपूर्णत: बंद करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त श्री. विजय सिंघल यांनी घेतला आहे.
दिनांक 28 एप्रिल 2020 च्या मध्यरात्रीपासून ते दिनांक 3 मे 2020 च्या मध्यरात्रीपर्यंत वागळे प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 16 मधील सी. पी. तलाव, राम नगर, श्रीनगर, वारलीपाडा, शांतीनगर, केलासनगर, जुनागाव परिसरासह संपूर्ण प्रभाग क्रमांक 16, प्रभाग क्रमांक 17 मधील अंबिका नगर, राजीव गांधी नगर, भटवाडी, किसन नगर न. 2 व 3. शिवटेकडी, गणेश चौक, रोड नं. 16 व 22 परिसरासह संपूर्ण प्रभाग क्रमांक 17, व प्रभाग क्रमाक 18 मघाल पडवळनगर, जय महाराष्ट नगर, किसन नगर न. 1, पंचपरमेश्वर मंदिर, रतनबाई कंपाऊंड, शिवाजीनगर जनता झोपडपटटी परिसरासह संपूर्ण प्रभाग क्रमांक 18 यासह संपूर्ण वागळे प्रभाग समिती परिसर पूर्णपणे बंद करण्यात येत आहे.
तसेच या परिसरात अत्यावश्यक सेवेतील सुरू असणारी दुकाने आज पासून 3 मे 2020 पर्यंत पूर्णतःबंद करण्यात येत आहेत. यामध्ये मासळी, मटन व चिकन विक्री करणारी स्थायी आस्थापनेतील दुकाने, अन्नधान्याची दुकाने, बेकरी, भाजीपाला व फळांची स्थायी दुकाने व मनपाने तात्पुरती केलेली भाजीपाला व फळांची दुकाने / मार्केट, दुध, अन्नधान्य, भाजीपाला, फळे, बेकरी, मासळी, चिकन/मटण व इतर जीवनावश्यक वस्तुंची घरपोच सेवा (Home Delivery) संपुर्णत : बंद राहणार आहे. या परिसरातील फक्त औषधांची दुकाने/ दुध डेअरी ( औषध दुकानातील औषध खाद्यपदार्थ वगळून ) सुरू राहणार आहेत.