टोकावडे येथील तरुणाने दाखविला माणुसकीचा धडा


टोकावडे : देशात कोरोना आजार, लाॕकडाऊन व आर्थिक मंदीच्याकाळात मुरबाड तालुक्यातील टोकावडे येथील माजी उपसरपंच श्री.बंदू धाऊ पवार यांचे पुतणे श्री संदीप पुंडलिक पवार यांनी  टोकावडे बाजारपेठेत सापडलेली पैसे व कागदपत्रे असलेली पिशवी तळेगाव येथील श्री.अर्जून गणपत देशमुख यांना कुणबी समाज संघटना मुरबाडचे सरचिटणीस प्रकाश पवार सर यांच्या हस्ते परत करुन माणुसकीचे दर्शन घडविले आहे.


सकाळी श्री.देशमुख हे मुरबाड येथे डाॕक्टरकडे गेले होते. टोकावडे येथे औषधे घेऊन घरी तळेगाव येथे परत असताना वनविभाग टोकावडे गेटपाशी पिशवी रस्यावर पडली.


तळेगाव येथे गेल्यावर पिशवी कोठेतरी पडली आहे हे लक्षात आले. लाॕकडाऊन असल्याने टोकावडे येथे रस्त्यावर वर्दळ नव्हती. आपली टूव्हीलर काढण्यासाठी संदीप पवार जात असताना त्यांना ही पिशवी सापडली. या पिशवीत महत्वाची कागदपत्रे, औषधे व रोख ६२,५००/- होते. संदीप पवार यांनी ती पिशवी माजी उपसरपंच बंदू पवार व प्रकाश पवार सर यांच्या हस्ते श्री.अरुण देशमुख यांना परत केली.


संदीप पवार यांनी माणुसकीचे दर्शन घडवून एक समाजापुढे आदर्श ठेवला आहे. संदीप पवार यांचे तालुक्यातव परिसरात कौतुक होत आहे.