एक हात मदतीचा


शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा माजी सरपंच भरत भोईर यांनी केले गरिबांना धान्य वाटप


डोंबिवली : कोरोना वायरस च्या वाढत्या प्रभावामुळे ग्रामीण विभागातही याचा मोठा फटका बसला आहे ग्रामीण विभागामध्ये सुद्धा लोक डाऊन मुळे दहिसर विभागामध्ये काम करणाऱ्या बाहेरील मजुरांना शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा माजी सरपंचश्री भरत कृष्ण भोईर यांनी शेकडो मजुरांना अन्नधान्याचे वाटप केले. 


दहिसर विभागामध्ये वेगवेगळ्या कंपन्या मध्ये तसेच इतरत्र काम करणाऱ्या मजुरांनवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून एक हात मदतीचा देण्याकरिता शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा माजी सरपंच दहिसर श्री भरत कृष्णा भोईर यांनी हजारो मजुरांना शेकडो क्विंटल अन्नधान्याचे वाटप करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. श्री भरत कृष्णा भोईर यांच्या बंगल्यासमोर दररोज शेकडो मजुरांच्या अन्नधान्य करिता रांगा लागल्याचे दिसून येते. भरत भोईर यांनी मजुरांना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याचे वाटप केल्यामुळे मजूर वर्गातून त्यांचे कौतुकही करण्यात येत आहे.



दहिसर विभागातील वाढत्या शहरीकरणामुळे बाहेरील तसेच हजारो परप्रांतीय मजूर आपल्या उदरनिर्वाह भागविण्याकरिता काम करतांना दिसून येतात. परंतु गेली पंधरा दिवसापासून पोरांना सर्वत्र कोरोनाव्हायरस ने थैमान घातल्यामुळे सर्वत्र  लॉक डाउन सुरू असून ह्या मजुरांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली होती, परंतु सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा माजी सरपंच श्री भरत कृष्णा भोईर यांनी हजारो मजुरांना ह्या उपासमारीच्या विळख्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना अन्न धान्य वाटप सुरू केले आहे. श्री भरत भोईर यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.