राज्यात ३ मे पर्यंत कोणतीही दुकाने सुरु होणार नाहीत - राजेश टोपे
मुंबई - ३ मेपर्यंत महाराष्ट्रात कोणतीही दुकानं सुरु होणार नाहीत असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
केंद्र सरकारने काल रात्री उशिरा काही निर्देश दिले आहेत. ज्यानुसार काही दुकानांना, व्यवहारांना केंद्र सरकारने संमती दिली आहे. मात्र जोपर्यंत राज्य शासन यामध्ये निर्णय घेत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात असलेली दुकानं सुरु करण्याचा काही प्रश्नच येत नाही.
काल रात्री केंद्राने काही निर्णय घेतले आहेत. मात्र अद्याप राज्य सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही" असं टोपे यांनी म्हटलं आहे.