जिल्ह्यातील विविध तक्रारींच्या निवारण्यासाठी २४×७ कोरोना नियंत्रण कक्षाची स्थापना


जिल्ह्यातील विविध तक्रारींच्या निवारण्यासाठी २४×७ कोरोना नियंत्रण कक्षाची स्थापना


पुणे – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यामध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील नागरिकांना उद्भवणा-या कोरोनासह अन्य विविध समस्यांचे निवारण करण्यासाठी नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला आहे.


नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक 020- 26123371 /1077 (टोल फ्री) हा आहे. नियंत्रण कक्ष 24 X 7 कार्यरत आहे. त्यावर कोरोनाच्या अनुषंगाने सर्व तक्रारी स्वीकारल्या जातात. त्यासाठी उपजिल्हाधिकारी सुनील गाडे यांची स्वतंत्र समन्वयक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.


लॉकडाऊन परिस्थितीमुळे उद्योग व्यवसाय प्रभावित झाल्यामुळे कामगार विस्थापित, बेरोजगार व परराज्यातील अडकलेले कामगार यांच्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कामगारांच्या तक्रारींबाबत स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. या कक्षाचा संपर्क क्रमांक 020- 26111061 व मोबाईल क्रमांक 7517768603 हा आहे. या क्रमांकावर कामगारांच्या तक्रारी स्वीकारल्या जातील. या तक्रारींबाबत उपजिल्हाधिकारी सुभाष बागडे यांची नियुक्ती करण्यात आली  आहे.


जेष्ठ नागरीक व दिव्यांगांसाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक 020- 29706611 हा आहे. 


या नियंत्रण कक्षात सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत संपर्क करुन आपली तक्रार देता येईल. त्यासाठी सहाय्यक आयुक्त विजय गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कोरोना विषाणूच्या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांना तसेच कामगार, मजूर  व इतर कुठल्याही तक्रारीसाठी सदर नियंत्रण कक्षाकडे तक्रार देण्यात यावी. नागरिकांच्या तक्रारीचे तात्काळ निरसन व अंमलबजावणी नियंत्रण कक्षामार्फत करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.