संपुर्ण जगात व भारतात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा मोठ्या प्रादुर्भाव बघता रक्ताची गरज भासणार असल्यामुळे चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष मा.संजयजी खामकर यांच्या मार्गदर्शनाने ठाणे जिल्हाध्यक्ष भास्कर चव्हाण यांनी आज दि.३१ मार्च २०२०रोजी गुरुकुल विद्यालय मनोरमा नगर ठाणे येथे रक्तदानाचे आयोजन केले होते.
कोरोनाचा संसर्ग (बाधा) लक्षात घेत प्रशासनाचे आदेश व सुचनांचे पालन करुन रक्तदान करणाऱ्यांची गर्दी होऊ नये म्हणुन मोबाईल वर रक्तदान करणाऱ्यांची नोंदणी करण्यात आली व प्रत्येक रक्तदान करणाऱ्यांना वेळ देण्यात येवुन गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यात आली.
ठाणे शहरातुन मोठा प्रतिसाद मिळाला वैद्य रक्त पतपेढी यांच्या ४४ बाँटल रक्त देण्यात आल्यात.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे बंदोबंस्तात व्यस्त असतांना सुध्दा वेळ काढुन पोलिस विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी रक्तदान केले.
रक्तदान शिबीर यशस्वी करण्याकरिता चर्मकार विकास संघाचे शहराध्य सोमनाथ कांबळे महिला शहराध्यक्षा गिता पवार राजु कांबळे सुभाष बनसोङे दादासाहेब भोसले जिल्हा सचिव संघटक बापुसाहेब उदमले शहराध्यक्ष अशोक जाधव यांच्या सह पदधिकारी सदस्य यांनी यशस्वी पर्यंत केलेत. सर्व रक्तदान करणारे व वैद्य रक्त पेढीतील पदधिकारी कर्मचारी यांचे व यशस्वी करणाऱ्यांचे आभार जिल्हाध्यक्ष भास्कर चव्हाण यांनी आभार व्यक्त केले.