'मास्क' न वापरता फिरणाऱ्या एकाला न्यायालयाने सुनावली हजार रुपये दंडाची शिक्षा


पुणे – पुण्यात ‘मास्क’ न वापरता सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या एका ३१ वर्षीय नागरिकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करून न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने आरोपीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.


महेश शातांराम धुमाळ (वय-३१, धंदा -वेल्डींग, रा. नाना पेठ, पुणे) असे आरोपीचे नाव आहे.


याबाबत गणपतराव नामदेव थिकोळे (पोलीस हवालदार ५८२६, लष्कर पोलीस ठाणे, पुणे शहर) यांनी पोलिसात फिर्याद दिली होती.


याबाबत मिळालेली माहिती अशी कि, शहरातील कोरोना विषाणूचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकार, प्रशासनाने ‘मास्क’ वापरण्याचे नागरिकांना केले आहे. जर ‘ मास्क’ न वापरता आढळल्यास त्यावर गुन्हे दाखल केले जातील, असे सांगितले होते. त्यानुसार आज पुण्यात ‘मास्क’ न वापरता सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या ३१ वर्षीय महेश धुमाळवर गुन्हा दाखल केला आहे.


महेश हा पुण्यातील कॅम्प भागात दि ११ एप्रिल २०२० रोजी १८.३५ वा. इंदीरा गांधी चौक, ईस्ट स्ट्रीट रोड, कॅम्प, पुणे किं येथे तोंडाला मास्क न लावता आढळून आला. मास्क न लावता घातक कृती करुन वाहतूकबंदी आदेशाचे उल्लंघन करत विनाकारण फिरताना मिळून आल्याने पोलीस हवालदार गणपतराव नामदेव थिकोळे यांनी पोलिसात याबाबत फिर्याद दिली.


त्यानुसार पोलिसांनी महेश विरोधात दोषारोप पत्र दाखल करून सोमवारी (दि.१३ एप्रिल २०२०) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, लष्कर कोर्ट, पुणे शहर येथे हजर केले. यावेळी न्यायालयाने आरोपी महेश यास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.