मुंबई : लॉकडाऊन काळात देखील धारावीमध्ये नवनवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत.
सरकारने येथे कडक निर्बन्ध लावलेले असताना सरकारच्या आदेशाला हरताळ फासण्याचे काम सुरु आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडल्यावर सुद्धा येथील नागरिकांना त्याचे गांभीर्य नसावे याचे आश्चर्य वाटते.
सरकारने येथील भाजीपाला व फळ बाजार बंद करावा अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.