मुंबई - ‘चांदोबा चांदोबा भागलास का, लिंबोणीच्या झाडामागे लपलास का’, या गाण्यामधला चांदोबा, लहानांचा ‘चंदामामा’ आज आपल्याला मोठ्ठा दिसणार आहे.
तो आज संध्याकाळी पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ येणार आहे.
आज सात मे, बुद्धपौर्णिमा.
आज सायंकाळी आकाशात सूर्य मावळल्यानंतर लगेचच आकाशात पूर्ण तेजाने तळपणारा चंद्र दिसणार आहे.
साधारणपणे सायंकाळी पावणेसात वाजता हा पूर्ण चंद्र दिसू शकेल.
या खगोलीय घटनेला सूपरमून असे म्हणतात.
या वर्षातील हा शेवटचा सुपरमून आहे. या नंतर पुढील वर्षी २७ एप्रिल रोजी सुपरमून पाहता येईल.
यावेळी चंद्र पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो. त्यामुळे तो खूप तेजस्वी दिसतो म्हणून त्याला सुपरमून असे म्हणतात.
पृथ्वी आणि चंद्राचे नेहमी अंतर सरासरी ३ लाख ८५ हजार किमी असते. परंतु, या दिवशी हे अंतर थोडे कमी असते म्हणून या दिवशी चंद्र जास्त प्रकाशमान दिसतो.
पृथ्वीवरुन चंद्राचा ५९ टक्के भाग पाहता येतो.
हा सुपरमून साध्या डोळ्यांनी पाहता येईल.
त्यासाठी दुर्बिणीची आवश्यकता नाही.