भुकेची कोरोनावर मात स्मशानभूमीत शिजतोय भात !!   (स्मशानात भुतांऐवजी भेटला अन्नदाता)


मुरबाड : कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र माणुस माणसाला घाबरतो आहे . प्रत्येक जण समोर दिसता क्षणी एकमेकाला दूर लोटतोय. गेली चाळीस 
दिवसा पासून माणुस माणसाचा वैरी झाला आहे .शहारातील नातेवाईक गावाकडे आले तर त्यांना गांवच्या वेशिवरच मज्जाव केला जातोय. अशा भयानक परिस्थितीत अनोळखी माणसांची सावली सुध्दा अंगावर पडुन दिली जाणार नाही अशी खबरदारी घेतली जात असतानाच, मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागातुन हजारो मैल पायपीट करत गावाकडे निघालेल्या आबालवृद्धांना गावात कोण आसरा देणार ? शेवटी गावात विंतडवाद नको म्हणून गावच्या स्मशानभूमीतच जेवणाची व्यवस्था करण्यात आली यां बाबत मीळालेल्या माहिती नुसार पोटाची खळगी भरण्यासाठी महाराष्ट्रात आलेल्या तब्बल ९० मजुरांचा तांडा त्या मध्ये महिला, लहान बालके, म्हातारी माणसे भुकेने व्याकूळ झालेली, बदलापूर वरुन मुरबाड मार्गे छत्तीसगढ कडे रणरणत्या उन्हात पाई चालत जाताना पं.स. सदस्य श्रींकात धुमाळ यांच्या नजरेस पडली.  त्यांची जेवणाची व्यवस्था गावांमध्ये करावी तर कोरोनाच्या भयाने ग्रामस्थ आकांडतांडव करतील. शेवटी धुमाळ यांनी देवपे गावाजवळील स्मशानभूमीच्या पत्र्याच्या शेडमध्ये जेवण बनवून त्या ९० आबालवृद्धांना भरपेट जेवण देऊन तृप्त करुन मार्गस्थ केले. म्हणून प्रथमच स्मशानात भुतांऐवजी श्रीकांत धुमाळ नावाचा अन्नदाता  पहावयास मिळाला.