पत्रकारानां आर्थिक मदत आणि सुरक्षा विमा कवच द्या!! पत्रकार सुरक्षा समितीचे ठाणे जिल्हाधिकारी याना साकडे


 मुरबाड :  कोरोनामध्ये संकटात पोलीस, डॉक्टर, नर्स यांप्रमाणेच पत्रकारांचीही भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली असून, या प्रसिद्धी माध्यमातून च आपल्याला घर बसल्या सगळ्या काही घडामोडी बिन दिक्कत पहावयास मिळत आहेत. मात्र आज सरकारने अत्यावश्यक सेवा पुरविणा-यां मध्ये पत्रकारांचा समावेश न करता दुर्लक्षित केले आहे. त्यामुळे जिवाची बाजी लावून प्रत्येक घडामिवर लक्ष ठेवून ती आपल्या पर्यंत. पोहचविणा-या, पत्रकारानांही इतरांप्रमाणे  आर्थिक मदत आणि सुरक्षा कवच म्हणून विमा योजना लागु करावी, अशी मागणी पत्रकार सुरक्षा समितीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अरुण ठोंबरे यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचेकडे केली आहे.                                  


लॉकडाऊनच्या काळात सुरुवात झाल्यापासून ते आजपर्यंत पत्रकार हे आपला जीव धोक्यात टाकून वृत्तसंकलन करून प्रत्येक घडामोडीची माहिती  आपल्या पर्यंत, मोबाईल मार्फत सोशल मिडिया द्वारे आपल्या पर्यत देत आहे. त्यात रोज ई-पेपर आणि बातम्याचे पोर्टल, बित्तबातमीची अपडेट माहिती देण्याचा आटोकाट प्रयत्न करतो आहे.त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील इतरांप्रमाणेच  पत्रकार हा महत्वाचा घटक असूनही केवळ आरोग्य विभाग, पोलीस, आणि सहकार्य करणार्या सर्वांना  समाजातील महत्वाचा घटक समजून पत्रकारानीच प्रसिध्दी दिली असताना, सरकारने  डॉक्टरांना, सरकारी आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक, यांना विमा कवच जाहीर केले आहे.मात्र पत्रकाराना कोणतेही कवच नाही की आर्थिक मदत नाही. ठाणे जिल्ह्यात लहानमोठे असे एक ते दीड हजार पत्रकार असून त्यातील काही पत्रकार हे  (हातावर मोजण्या इतके) कायमस्वरूपात मोठ्या वृत्तपत्रात आणि चँनेलमध्ये काम करतात. बाकीचे पत्रकार हे जाहिरातीच्या कमिशनवर व नाममात्र मानधनावर बातमीदार किंवा प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत. लॉकडाऊनमुळे सगळे काही बंद झाल्याने त्यांची आर्थिक स्थिती बिघडली आहे. यासाठी पत्रकार सुरक्षा समितीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अरूण ठोंबरे यांनी जिल्हाधिकारी श्री राजेश नार्वेकर यांना व्हाट्सअप द्वारे व मेल द्वारे नम्र निवेदन दिले आहे. तसेच तालुकास्तरावर  पत्रकार सुरक्षा समितीचे सगळे अध्यक्ष व सचिव यांनी सुध्दा तहसीलदार यांना मागणी केली आहे.