मुंब्य्रात मोबाईलचे साहित्य विक्री करणा-या इसमाविरूद्ध गुन्हा दाखल


ठाणे :  कोविड 19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेतंर्गत फक्त जीवनावश्यक वस्तूंच्या व्यतिरिक्त छोट्या टेम्पो मधून मोबाईल व मोबाईलचे साहित्य विकणाऱ्या इसमाविरुध्द  रोग प्रतिबंधक कलम १८८ व महाराष्ट्र कोविड विनियम २०२० चे कलम व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये  मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर कारवाई ही महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी केली.


इकबाल मोहम्मद अली शेख असे गुन्हा दाखल केलेल्या व्यक्तीचे नाव असून जीवनावश्यक वस्तूंच्या व्यतिरिक्त छोट्या टेम्पो मधून मोबाईल व मोबाईलचे साहित्य विकत असल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.